Tuesday 26 October 2021

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ध्वन्यर्थ म्हणजे –

   1) व्यंजना शब्दशक्तीमुळे सुचित होणारा अर्थ      2) भाषेतील मूलध्वनींचा अर्थ
   3) अभिधा शक्तीमुळे जाणवणारा अर्थ      4) लक्षणा शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ
उत्तर :- 1

2) खालील शब्दाला पर्याय सांगा. – ‘खग’

   1) आकाशात फिरणारे    2) पक्षी   
   3) जलचर      4) उडता न येणारे

उत्तर :- 2

3) ‘सुवाच्य’ याचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही ?

   1) गिचमिड    2) दुर्बोध   
   3) अवाचनीय    4) अर्वाच्य

उत्तर :- 4

4) ‘अल्पज्ञानाने ताठा मिरविणे’ म्हणतात ना ........................

   1) उथळ पाण्याला खळखळाट फार      2) नाचता येईना अंगण वाकडे
   3) उंटावरचा शहाणा        4) आढे वेढे घेणे

उत्तर :- 1

5) पुढील वाक्यप्रचाराशी योग्य अर्थ सांगणारा पर्याय शोधा : गाशा गुंडाळणे.

   1) माशा मारणे    2) निघून जाणे   
   3) वाट लावणे    4) चादर पांघरणे

उत्तर :- 2

6) खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

   अ) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात.
   ब) ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दांस क्रियापदे असे म्हणतात.
   क) सर्वनाम ही नामप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्दजाती नाही तर ती स्वतंत्र आहे.

   1) अ व ब बरोबर    2) ब व क बरोबर   
   3) अ व क बरोबर    4) अ, ब व क बरोबर

उत्तर :- 1

7) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

   1) बलिष्ट    2) बलीष्ट     
   3) बलिष्ठ    4) भलिष्ट

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.

   1) प्    2) ख्   3) भ्   4) ध्

उत्तर :- 1

9) ‘नीरव’ या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो ?

   1) नि: + रव    2) नी + रव   
   3) नि + रव    4) नी: + रव

उत्तर :- 1

10) ‘धर्मीवाचक’ नामे कशास म्हणतात ?

   1) सामान्यनामे व विशेषनामे    2) सर्वनामे व विशेषणे
   3) सामान्यनामे व सर्वनामे      4) विशेषनामे व सर्वनामे

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment