1) “जो अत्यंत खर्चिक असतो तो” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) उधळया 2) कंजूष
3) दानशूर 4) चिकट
उत्तर :- 1
2) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
1) निर्भत्सना 2) नि:र्भत्सना
3) नीभर्त्सना 4) निर्भर्त्सना
उत्तर :- 4
3) आपल्या तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना काय म्हटले जाते ?
1) अक्षर 2) वर्ण
3) पद 4) वाक्य
उत्तर :- 2
4) निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?
1) नि: + कपट 2) निष् + कपट
3) निष्क + पट 4) न: क + पट
उत्तर :- 1
5) ‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही ?’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
1) भाववाचक नाम 2) विशेष नाम
3) धातुसाधित नाम 4) सामान्य नाम
उत्तर :- 3
6) खाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
1) प्रभाला आता साठावे वर्ष लागले 2) रत्नाला आठवीचा वर्ग शिकविण्यासाठी आला
3) आक्काला चौदा भाषा येतात 4) तिच्या सर्व साडया म्हणजे भरजरी शालूच आहे
उत्तर :- 4
7) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ?
1) प्रायोजक क्रियापद 2) शक्य क्रियापद
3) अनियमित क्रियापद 4) गौण क्रियापद
उत्तर :- 2
8) अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?
वाहन सावकाश चालवावे.
1) रीतीवाचक 2) निश्चयार्थक
3) स्थलवाचक 4) सातत्यदर्शक
उत्तर :- 1
9) शाळेतील विद्यार्थ्यांपैकी रमेश हुशार आहे. (शब्दाची जात ओळखा)
1) शब्दयोगी अव्यय 2) उभयान्वयी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
10) ‘चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?
1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 3
1) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?
‘विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला’
1) उत्तीर्ण 2) परीक्षेत 3) झाला 4) विश्वाय
उत्तर :- 4
2) पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.
ती मुलगी चांगली गाते.
1) मुलगी 2) ती 3) गाते 4) चांगली
उत्तर :- 2
3) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. – अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.
1) साधित विशेषण 2) परिणाम दर्शक विशेषण
3) नामसाधित विशेषण 4) अविकारी विशेषण
उत्तर :- 3
4) ‘मला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?
1) शक्य क्रियापद 2) प्रयोजक क्रियापद 3) अनियमित क्रियापद 4) साधित क्रियापद
उत्तर :- 1
5) जोडया जुळवा.
अ) नामसाधित क्रियाविशेषणे i) निजल्यावर, खेळताना
ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे ii) दररोज, शास्त्रदृष्टया
क) धातुसाधित क्रियाविशेषणे iii) सकाळी, प्रथमत:
ड) समासघटित क्रियाविशेषणे iv) मोटयाने, सर्वत्र
अ ब क ड
1) iii iv i ii
2) iii i iv ii
3) iv ii iii i
4) i iii iv ii
उत्तर :- 1
6) आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागतो. या वाक्यातील ‘आणि’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
1) विकल्पबोध अव्यय 2) समुच्चबोध अव्यय
3) न्यूनत्वबोध अव्यय 4) शब्दयोगी अव्यय
उत्तर :- 2
7) खालीलपैकी किती आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यये आहे.
ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्या
1) पाच 2) तीन
3) सर्व 4) चार
उत्तर :- 3
8) ‘सुधाने निबंध लिहला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा.
1) रीती भविष्यकाळ 2) पूर्ण भविष्यकाळ
3) अपूर्ण भविष्यकाळ 4) साधा भविष्यकाळ
उत्तर :- 3
9) ‘बछडा’ या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.
1) वाघीण 2) बछडी
3) भाटी 4) हंसी
उत्तर :- 2
10) करण म्हणजे ...........................
1) क्रियेचे साधन किंवा वाहन 2) क्रियेचा आरंभ
3) क्रियेचे स्थान 4) वरील कोणताही पर्याय योग्य नाही
उत्तर :- 1
1) खाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
1) प्रभाला आता साठावे वर्ष लागले 2) रत्नाला आठवीचा वर्ग शिकविण्यासाठी आला
3) आक्काला चौदा भाषा येतात 4) तिच्या सर्व साडया म्हणजे भरजरी शालूच आहे
उत्तर :- 4
2) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ?
1) प्रायोजक क्रियापद 2) शक्य क्रियापद
3) अनियमित क्रियापद 4) गौण क्रियापद
उत्तर :- 2
3) अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?
वाहन सावकाश चालवावे.
1) रीतीवाचक 2) निश्चयार्थक
3) स्थलवाचक 4) सातत्यदर्शक
उत्तर :- 1
4) शाळेतील विद्यार्थ्यांपैकी रमेश हुशार आहे. (शब्दाची जात ओळखा)
1) शब्दयोगी अव्यय 2) उभयान्वयी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
5) ‘चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?
1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 3
6) पुढील शब्द कोणत्या शब्दजाती मधील आहे? – ‘वावा’
1) सर्वनाम 2) शब्दयोगी अव्यय
3) उभयान्वयी अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :- 4
7) खालील वाक्याचा काळ ओळखा. – हरीने आंबा खाल्ला.
1) वर्तमानकाळ 2) भूतकाळ
3) भविष्यकाळ 4) पूर्ण भूतकाळ
उत्तर :- 2
8) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो.
1) मजा 2) ढेकर
3) तंबाखू 4) सर्व
उत्तर :- 4
9) विभक्तीचे मुख्य कारकार्थे किती आहेत ?
1) आठ 2) सात
3) पाच 4) सहा
उत्तर :- 4
10) “समाजात विषमता असू नये” – या वाक्याचा पुढीलपैकी होकारार्थी पर्याय निवडा.
1) समाजात समानता नसावी 2) समाजात समानता असावी
3) समाजात विषमता आहे 4) समाजात विषमता असावी
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment