1) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
1) गाय गुराख्याकडून बांधली जाते 2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
3) शिक्षक मुलांना शिकवितात 4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे
उत्तर :- 1
2) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.
1) कर्मधारय 2) तत्पुरुष
3) मध्यमपदलोपी 4) बहुव्रीही
उत्तर :- 3
3) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.
1) - 2) ?
3) ! 4) ”
उत्तर :- 3
4) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.
1) श्लेष 2) आपन्हुती
3) यमक 4) दृष्टांत
उत्तर :- 2
5) ‘तद्भव’ शब्द निवडा.
1) ओठ 2) आठव
3) आयुष्य 4) आठशे
उत्तर :- 1
6) खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.
‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
1) पृथकत्ववाचक संख्याविशेषण 2) अनिश्चित संख्याविशेषण
3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण 4) सार्वजनिक विशेषण
उत्तर :- 3
7) ‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द .................... हा आहे.
1) ते 2) येते 3) ये 4) येणे
उत्तर :- 3
8) दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
जेवताना सावकाश जेवावे.
1) स्थिती दर्शक 2) गतिदर्शक
3) रितीवाचक 4) निश्चयार्थक
उत्तर :- 3
9) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
1) विरोधवाचक 2) विनिमयवाचक
3) कैवल्यवाचक 4) तुलनावाचक
उत्तर :- 2
10) ‘लांबचा प्रवास बसने करावा की कारने’ या वाक्यातील ‘की’ हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?
1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 4) उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment