1) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
1) तालव्य 2) मूर्धव्य 3) दन्त्य 4) ओष्ठय
उत्तर :- 1
2) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –
1) मन + रथ 2) मनो + रथ 3) मन + ओरथ 4) मन: + रथ
उत्तर :- 4
3) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.
1) विकारी 2) अविकारी 3) दोन्ही 4) दोन्ही नाही
उत्तर :- 1
4) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.
1) वकिली 2) गुलाम 3) गायक 4) लबाड
उत्तर :- 1
5) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
1) अनिश्चित 2) संबंधी 3) दर्शक 4) आत्मवाचक
उत्तर :- 4
6) पुढील वाक्यातील मुळ विधेय कोणते आहे ?
“पूर्वी घडून आलेला आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.”
1) आणखी एक 2) प्रसंग
3) आहे 4) सांगण्यासारखा
उत्तर :- 3
7) खालील वाक्य कोणत्या कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकाराचे आहे ?
‘त्याची गोष्ट वाचून झाली.’
1) शक्य कर्मणी प्रयोग 2) समापण कर्मणी प्रयोग
3) नवीन कर्मणी प्रयोग 4) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग
उत्तर :- 2
8) ‘रामकृष्ण’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
1) अव्ययीभाव समास 2) कर्मधारय समास
3) बहुव्रीही समास 4) व्दंव्द समास
उत्तर :- 4
9) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते चिन्ह वापर करतात.
1) स्वल्पविराम 2) अर्धविराम
3) अपूर्ण विराम 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
10) पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता ?
1) किमयागार 2) विसंगत
3) विधिलिखित 4) विश्वासघात
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment