1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?
1) अपसरण चिन्ह 2) स्वल्पविराम 3) अपूर्ण विराम 4) संयोग चिन्ह
उत्तर :- 4
2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.
1) यमक – अनुप्रास 2) अनन्वय – दृष्टान्त 3) अन्योक्ती – स्वभावोक्ती 4) शब्दालंकार आणि अर्थालंकार
उत्तर :- 4
3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे ?
1) अभ्यस्त 2) सामासिक 3) प्रत्ययसाधित 4) यापैकी कोणताही नाही
उत्तर :- 1
4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) धववाणी
उत्तर :- 3
5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) जलद 2) कसर 3) पथ 4) वीज
उत्तर :- 4
6) ............... ! केवढा मोठा हा धबधबा.
1) सबब 2) अबब 3) वाहवा 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
7) ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे या वाक्यातील काळ ओळखा.
1) अपूर्ण वर्तमानकाळ 2) पूर्ण वर्तमानकाळ 3) रीति वर्तमानकाळ 4) रीति भूतकाळ
उत्तर :- 4
8) ‘भाऊबहीण’ या शब्दाचे लिंग कोणते ?
1) पुल्लिंग 2) नपुंसकलिंग 3) स्त्रीलिंग 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
9) योग्य जोडया जुळवा.
विभक्ती कारक
a) पंचमी I) घराशी
b) तृतीया II) घरात
c) षष्ठी III) घरातून
d) सप्तमी IV) घराचा
a b c d
1) II III I IV
2) III I IV II
3) I IV II III
4) IV II III I
उत्तर :- 2
10) खालील गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा.
‘मीनाला नोकरी नाही, रमेशची नोकरी सुटलेली अशा वेळीतिची स्थिती ........................... अशी झाली.’
1) खाल्ल्या घरचे वासे मोजणारी 2) उघडया डोळयांनी मरणे पाहणे
3) इकडे आड तिकडे विहीर 4) खुळ लागणे
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment