Monday 2 December 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील उद्देशदर्शक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते?

   1) शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो.    2) जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
   3) तुला जसे वाटेल तसे वाग        4) जेव्हा घाम गाळवा तेव्हाच खायला भाकरी मिळते.

उत्तर :- 1

2) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) तुलनावाचक    2) विरोधवाचक    3) कैवल्यवाचक    4) विनिमयवाचक

उत्तर :- 4

3) ‘लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

   1) समुच्चबोधक    2) परिणामबोधक    3) न्यूनत्वबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 4

4) योग्य जोडया लावा.

   अ) संबोधनदर्शक – अहो
   ब) संमतिदर्शक – बराय
   क) प्रशंसादर्शक – यंवं
   1) अ      2) अ, क      3) अ, ब, क    4) अ, ब

उत्तर :- 3

5) रीती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
   1) मी लेखन करीत राहीन      2) मी लेखन केले आहे
   3) माझे लेखन झाले आहे      4) मी लेखन करीत असतो
उत्तर :- 4

6) खालील ‘अनुकरणवाचक शब्द’ कोण्या शब्दाच्या जातीचा आहे ? ‘सुटसुटीत’
   1) नाम      2) विशेषण    3) क्रियापद    4) क्रियाविशेषण

उत्तर :-  2

7) ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात ?

   1) उभयविध    2) व्दिकर्मक    3) विधानपुरक    4) अपूर्णविधान

उत्तर :- 2

8) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

     ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात.
   1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
   3)  परिणामवाचक ‍क्रियाविशेषण अव्यय    4) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 3

9) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘पावेतो’
   1) कालवाचक    2) स्थलवाचक   
   3) संग्रहवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

10) ‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या
     कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) उद्देशबोधक      2) कारणबोधक   
   3) स्वरूपबोधक    4) संकेतबोधक

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment