1) शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.
1) काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य 2) नाम वाक्य
3) कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य 4) विशेषण वाक्य
उत्तर :- 3
2) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘समीप’
1) करणवाचक 2) स्थलवाचक
3) संग्रहवाचक 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
3) परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?
1) म्हणून, सबब 2) अथवा, किंवा
3) परी, पण 4) व, आणि
उत्तर :- 1
4) ‘हुडु !’ या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.
1) तिरस्कार 2) विरोध
3) संबोधन 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
5) ‘तो निजत असेल’ – या विधानातील काळ ओळखा.
1) भूतभविष्य काळ 2) वर्तमानभविष्य काळ
3) भविष्यभविष्य काळ 4) यापैकी एकही नाही
उत्तर :- 2
6) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग कोणते?
1) स्त्रीलिंग 2) पुल्लींग
3) नपुंसकलिंग 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
7) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.
1) पंचमी 2) संबोधन
3) सप्तमी 4) षष्ठी
उत्तर :- 2
8) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.
1) विधानार्थी 2) प्रश्नार्थी
3) उद्गारवाची 4) होकारार्थी
उत्तर :- 3
9) “हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.”
वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते ?
1) हवा कोंदट असल्यास 2) मनुष्याची
3) प्रकृती 4) बिघडते
उत्तर :- 1
10) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.
1) रामाने रावणास मारला 2) रामाकडून रावण मारला गेला
3) राम रावणास मारील 4) रामाने रावणास मारले
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment