1) खालीलपैकी ‘दंतौष्ठय’ वर्ण कोणता?
1) ओ 2) औ 3) व 4) च
उत्तर :- 3
2) पुढील चुकीचा संधीविग्रह कोणता, ते सांगा.
1) गुरु + ओघ – गुर्वेध 2) रमा + इच्छा – रमेच्छा
3) स्व + ईर – स्वैर 4) प्रीति + अर्थ – प्रीत्यर्थ
उत्तर :- 1
3) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
1) भाववाचक नाम 2) सामान्य नाम
3) विशेषण 4) सर्वनाम
उत्तर :- 2
4) चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, तो मुलगा चांगला आहे.
अधोरेखित शब्दांचे विशेषण ओळखा.
अ) पहिल्या वाक्यात अधि विशेषण ब) दुस-या वाक्यात विधी विशेषण
क) पहिल्या वाक्यात विधी विशेषण ड) दुस-या वाक्यात अधि विशेषण
1) अ आणि ड बरोबर 2) अ आणि ब बरोबर
3) क आणि ड बरोबर 4) ब आणि ड बरोबर
उत्तर :- 2
5) वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
‘चेंडू’ सीमा रेषेबाहेर जाऊन स्थिरावला.
1) संयुक्त क्रियापद 2) साधित क्रियापद
3) प्रायोजक क्रियापद 4) शक्य क्रियापद
उत्तर :- 2
6) शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.
1) काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य 2) नाम वाक्य
3) कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य 4) विशेषण वाक्य
उत्तर :- 3
7) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘समीप’
1) करणवाचक 2) स्थलवाचक
3) संग्रहवाचक 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
8) परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?
1) म्हणून, सबब 2) अथवा, किंवा
3) परी, पण 4) व, आणि
उत्तर :- 1
9) ‘हुडु !’ या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.
1) तिरस्कार 2) विरोध
3) संबोधन 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
10) ‘तो निजत असेल’ – या विधानातील काळ ओळखा.
1) भूतभविष्य काळ 2) वर्तमानभविष्य काळ
3) भविष्यभविष्य काळ 4) यापैकी एकही नाही
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment