1) ‘उपपद’ किंवा ‘कृदन्त – तत्पुरुष’ समासाचे उदाहरण कोणते?
1) नास्तिक 2) रक्तचंदन
3) अहिंसा 4) पांथस्थ
उत्तर :- 4
2) विरामचिन्हे किती प्रकारची आहेत ?
1) एक 2) दोन
3) तीन 4) चार
उत्तर :- 2
3) ‘सिध्द’ शब्द कशाला म्हणतात ?
1) भाषेतील मूळ शब्द जो भाषा सिध्द करतात 2) परभाषेतून आलेले शब्द
3) भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात 4) भाषेतील मूळ शब्द जे बदलत असतात
उत्तर :- 3
4) पुढील पद्य पंक्तीस कोणता रस आहे ?
‘जुने जाऊ द्या भरणा लागुन,
जाळुनी किंवा पुरुनी टाका !’
1) करुण 2) रौद्र
3) हास्य 4) बीभत्स
उत्तर :- 2
5) ‘अंबर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) परमेश्वर 2) आकाश
3) अभंग 4) अमर
उत्तर :- 2
6) ‘उन्नती’ या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा.
1) अवनिती 2) विकृती
3) प्रगती 4) अवनती
उत्तर :- 4
7) खालील वाक्यातील म्हणीच्या योग्य अर्थासाठी समर्पक वाक्य निवडा.
‘पोलिसांनी रघुला चोरीच्या आरोपाखाली अटक केली. पण कर नाही त्याला डर कशाला असे म्हणून तो शांत होता.’
1) तो गुन्हेगार होता 2) तो अपराधी नव्हता
3) तो बेईमान होता 4) त्याला अपराधी वाटत होते
उत्तर :- 2
8) भरडले जाणे : या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
1) संकटे येणे 2) पीठ दळणे
3) लढा देणे 4) दु:खाचे आघात होणे
उत्तर :- 4
9) “जो भविष्य सांगतो तो” – या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) ज्योतिष 2) ज्योतिषी
3) जादूगार 4) भविष्यक
उत्तर :- 2
10) लेखननियमांनुसार शुध्द शब्द ओळखा.
1) कोटयधीश 2) कोटयाधीश
3) कोटयधिश 4) कोटटधिश
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment