1) खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा.
1) दशरथाने कैकयीला दोन वर दिले 2) तू त्या राजपुत्राला वर
3) पक्षी झाडावर बसतो 4) वरपिता मुलाच्या लग्नात उपस्थित नव्हता
उत्तर :- 4
2) संयुक्त क्रियापदे म्हणजे
1) कृदन्त + धातुसाधित 2) प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद
3) धातू + क्रियादर्शक पद 4) धातुसाधित + सहाय्यक क्रियापद
उत्तर :- 4
3) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – नेता लोक मोठमोठयाने बोलत होते.
1) नाम 2) सर्वनाम
3) विशेषण 4) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर :- 4
4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘ठायी’
1) स्थलवाचक 2) कालवाचक
3) संग्रहवाचक 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
5) न्युनत्वबोधक संयुक्तवाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?
1) आणि, व 2) अथवा, किंवा
3) पण, परंतु 4) म्हूणून, सबब
उत्तर :- 3
6) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग कोणते?
1) नपुंसकलिंग 2) स्त्रीलिंग
3) पुल्लिंग 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
7) अयोग्य जोडी निवडा.
अ) सप्तमी - 1) आपादान
ब) पंचमी - 2) अधिकरण
क) तृतीया - 3) करण
ड) षष्ठी - 4) संबंध
1) फक्त अ आणि ब 2) फक्त अ
3) फक्त ब आणि क 4) फक्त क आणि ड
उत्तर :- 1
8) तुम्ही मला मदत करणार नाही – योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा.
1) तुम्ही मला काय मदत करणार ? 2) तुम्ही मला मदत करणार का ?
3) तुम्ही मला मदत केली नाही ? 4) तुम्ही मदत कराल ना ?
उत्तर :- 1
9) “आज संपत्ती त्याजपाशी आहे.” – या वाक्यातील मुळ उद्देश कोणते ?
1) आज 2) त्याजपाशी
3) संपत्ती 4) आहे
उत्तर :- 3
10) ‘विराम निबंध लिहितो’ प्रयोग ओळखा.
1) कर्मणी 2) कर्तरी
3) भावे 4) संकीर्ण
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment