1) ‘सहलीस गेल्यावेळी आम्ही भरपूर पाणी प्यायलो’ या वाक्यातील अधोरेखित ‘अव्ययाचा’ प्रकार ओळखा.
1) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय
उत्तर :- 4
2) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ‘कडे, मध्ये, प्रमाणे’ ही शुध्द शब्दयोगी अव्यये आहेत.
ब) ‘च, मात्र, ना’ ही शब्दयोगी अव्यये नाहीत.
1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर 3) अ आणि ब बरोबर 4) अ आणि ब चूक
उत्तर :- 4
3) ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली’, या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते ?
1) विकल्पबोधक 2) परिणामबोधक 3) न्यूनत्वबोधक 4) समुच्चयबोधक
उत्तर :- 4
4) बिनचूक जोडी निवडा.
अ) आश्चर्यकारक - ओहो
ब) हर्षदर्शक - आहा
क) तिरस्कारदर्शक - इश्श
1) अ, ब, क 2) ब, क 3) अ, क 4) अ
उत्तर :- 1
5) पुढील वाक्यातील ‘काळ’ चार पर्यायातून निवडा. – सीता अभ्यास करीत आहे.
1) अपूर्ण वर्तमानकाळ 2) रीती वर्तमानकाळ 3) पूर्ण वर्तमानकाळ 4) साधा वर्तमानकाळ
उत्तर :- 1
6) पुढील शब्दाचे ‘लिंग’ ओळखा. – तट्टू
1) स्त्रीलिंग 2) नपुंसकलिंग 3) पुल्लिंग 4) इष्टलिंग
उत्तर :- 2
7) योग्य विधाने निवडा.
अ) आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.
ब) आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.
1) दोन्ही योग्य 2) दोन्ही अयोग्य 3) फक्त ब योग्य 4) फक्त अ योग्य
उत्तर :- 1
8) ‘तारू’ या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ?
1) तारू 2) तारूस 3) तारवा 4) तारवास
उत्तर :- 3
9) अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. – “त्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत.”
1) अष्टमी 2) सप्तमी 3) षष्ठी 4) पंचमी
उत्तर :- 2
10) ‘समोसे चांगले झाले आहेत’ – या वाक्याचे उद्गारार्थी रूप कसे होईल ?
1) समोसा ? चांगला झालाय 2) वा ! मस्त झालेत समोसे
3) समोसा, नाही बुवा चांगला झाला 4) चांगले लागतात समोसे
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment