1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य 2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य 4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य
उत्तर :- 2
2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
स्तव
1) तुलनावाचक 2) हेतुवाचक 3) दिक्वाचक 4) विरोधवाचक
उत्तर :- 2
3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’
1) परिणामबोधक 2) स्वरूपबोधक 3) कारणबोधक 4) विकल्पबोधक
उत्तर :- 2
4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’
1) उभयान्वयी 2) केवलप्रयोगी 3) सर्वनाम 4) क्रियापद
उत्तर :- 2
5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
1) वर्तमानकाळ 2) अपूर्ण वर्तमानकाळ
3) पूर्ण वर्तमान काळ 4) रीतिवर्तमान काळ
उत्तर :- 4
6) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.
1) हर्ष 2) आनंदीआनंद
3) हास्य 4) उत्साह
उत्तर :- 1
7) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?
1) सज्जन 2) दुर्जन
3) प्रेमीजन 4) विद्ववत्जन
उत्तर :- 2
8) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.
1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी 2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला 4) उथळ पाण्याला खळखळाट फार
उत्तर :- 4
9) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1) शेतीला पाणी देणे 2) त्याग करणे
3) इतरांना मदत करणे 4) कोंडी फोडणे
उत्तर :- 2
10) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.
1) अग्रज 2) अपूर्व
3) अनुज 4) अष्टावधानी
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment