Sunday 24 November 2019

भारताचा नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) प्रकल्प

🔰दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी गृह मंत्रालयाने भारत सरकारचा नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) नावाचा प्रकल्प 31 डिसेंबर 2020 पर्यंत कार्यरत होणार असल्याचे जाहीर केले.

🔴NATGRID बाबत...

🔰नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) या प्रकल्पाची सुरूवात 2009 साली करण्यात आली. डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेस म्हणजेच नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) याच्याशी जोडण्याची भारत सरकारची योजना आहे.

🔰नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) यावर खात्यांची संपूर्ण माहिती इमिग्रेशन एंट्री, बँकिंग आणि फोन क्रमांक अश्या विविध बाबींविषयीची माहिती संकलित केली जाणार, ज्यामुळे आजच्या सायबर जगात पोलीस तपासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आहे.

🔰दूरसंचार, करासंबंधी अहवाल, बँक, इमिग्रेशन यासारख्या 21 संघांच्या 11 कार्यालयांकडून या व्यासपीठावर माहिती गोळा केली जाते. गुप्तचर विभाग (IB), रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (R&AW) यासारख्या सुमारे 10 केंद्रीय संस्था त्यामधली साठविलेली माहिती सुरक्षित मार्गाने प्राप्त करतात.

No comments:

Post a Comment