Thursday, 7 November 2019

सुमंत कठपलिया: इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी..

✴️ इंडसइंड बँक लिमिटेड याच्या संचालक मंडळाने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सुमंत कठपलिया यांची नेमणूक केली आहे.

✴️ सुमंत कठपलिया यांची निवड सध्याचे CEO रोमेश सोबती यांच्या जागेवर केली गेली आहे. या नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे.

✴️ गेल्या दशकभरापासून प्रमुखपदी असलेले रोमेश सोबती वयाचे 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

✴️ सुमंत कठपलिया सध्या हिंदुजा उद्योग-समुहाचा पाठिंबा असलेल्या इंडसइंड बँकेत ग्राहक कर्ज विभागाचे प्रमुख आहेत.

✴️ 55 वर्षांचे कठपलिया हे 2008 सालापासून बँकेसोबत जुळलेले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...