Sunday, 24 November 2019

मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये केवळ चार्टड विमानांसाठी खर्च झाले २५५ कोटी

✍पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी केवळ चार्टड विमानाचा एकूण खर्च २५५ कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेमध्ये दिली. पराराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.

✍मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी चार्टड विमानप्रवासाचा खर्च किती झाला यासंदर्भात केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नाला मुलरीधरन यांनी लेखी उत्तर दिले. यामध्ये २०१६-१७ साली मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान वापरण्यात आलेल्या चार्टड विमानांसाठी ७६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाल्याचे मुलरीधनरन यांनी सांगितलं.

✍तसेच २०१७-१८ साली हाच खर्च वाढून ९९ कोटी ३२ लाख रुपयापर्यंत गेल्याचे या उत्तरात म्हटलं आहे. २०१८-१९ साली चार्टड विमानांसाठी भारत सरकारने ७९ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे मुलरीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.

✍चार्टड विमाने ही छोट्या अंतरासाठी वापरली जातात. एखाद्या देशात गेल्यानंतर तेथे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी या विमानांचा वापर जगभरातील नेते करतात.

No comments:

Post a Comment