Saturday, 23 November 2019

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

१) .  खालीलपैकी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते ?

   1) सी. रंगराजन
   2) मनमोहन सिंग   
   3) डॉ. डी. सुब्बाराव   
   4) नरेंद्र जाधव

   उत्तर :- 4

२).  पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

   1) मंत्रीमंडळ 
  2) राष्ट्रपती  
  3) राज्यसभा    
  4) लोकसभा

उत्तर :- 4

३).  कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?

   1) 42 वी घटनादुरुस्ती 
   2) 44 वी घटनादुरुस्ती
   3) 24 वी घटनादुरुस्ती  
   4) 52 वी घटनादुरुस्ती

उत्तर :- 1

४) . भारतातील संसदीय शासनपद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे.

   ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो.

   क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात.

   ड) मंत्रीमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तीगतरीत्या जबाबदार असते.

   1) अ, ब, क
   2) ब, क, ड  
   3) अ, क, ड  
   4) अ, ब, ड

उत्तर :- 1

५) . राष्ट्रपतीकडून पंतप्रधान निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते ?

   अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.

   ब) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.

   क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.

   ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.

   1) अ   
   2) अ, ब    
   3) अ, क    
   4) अ, क, ड

    उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...