Tuesday, 19 October 2021

अलंकार

अलंकार म्हणजे दागीणे होय

कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही.

शब्दालंकार

अर्थालंकार

यमक

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.

उदा :

🔷जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ

🔷पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला

पुष्ययमक

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.

दामयमक

🔹आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला

🔹पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

🔹तल्लिले मधि तल्लीन न हो कल्लोलिनी! कवी कवण तरी?
जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी

श्लेष

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा :

🌿सूर्य उगवला झाडीत...
झाडूवाली रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...

🌿राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण

अर्थश्लेष

वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा :

🔹तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच

सभंग श्लेष

उदा :

🔹श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी

🔹कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने

🔹ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...