अलीकडेच मलेशिया या देशातल्या शेवटच्या सुमात्रीयन गेंड्याचा मृत्यू झाला असून आता या देशात ही प्रजाती अस्तित्वात नाही.
शेवटच्या गेंड्याचे नाव ‘इमान’ असे होते, ती एक मादा होती. तिचा 23 नोव्हेंबर 2019 रोजी आजाराने मृत्यू झाला.
सुमात्रीयन गेंडा ही गेंड्याची आकाराने सर्वात छोटी असलेली प्रजाती आहे.
ही केसाळ आणि दोन शिंगी गेंड्याची प्रजाती शेवटची असून एका अंदाजानुसार जगात केवळ 80 गेंडे शिल्लक आहेत.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) या संस्थेनी सुमात्रीयन गेंड्याच्या प्रजातीला नामशेष असे दर्शवत त्याला त्याच्या ‘रेड लिस्ट’ मध्ये ठेवलेले आहे.
No comments:
Post a Comment