Monday, 25 November 2019

व्हीप म्हणजे नेमके काय?

  ✓ व्हीप' म्हणजे पक्षशिस्तीचे पालन करणे, असा सोपा अर्थ आहे.
     ✓ विविध पक्षांचे गटनेते किंवा प्रतोदही त्या-त्या सभागृहात प्रतिनिधित्व करत असतात. संसदीय कार्यप्रणालीत मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) आणि प्रतोद (व्हीप) यांची भूमिका महत्त्वाची असते.
   ✓ प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप (प्रतोद) असतो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या व्हीपने करायचे असते. लोकसभेत किंवा विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान व्हायचे असेल आणि संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला असेल, तर त्याबाबतचा आदेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो.

      ✓ व्हीप त्या-त्या पक्षाच्या सर्व आमदारांना बंधनकारक असतो. कुठल्याही आमदाराने हा आदेश धुडकावून पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई तर होऊ शकतेच, शिवाय त्याला पदही गमवावे लागू शकते. त्यामुळे आपले आमदार. खासदार फुटू नयेत म्हणून महत्त्वाच्या राजकीय निर्णयाप्रसंगी राजकीय पक्ष व्हीप जारी करतात.

     ✓ दरम्यान, भारतात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेचे सदस्य (खासदार) किंवा विधानसभेचे सदस्य (आमदार) यांना व्हीप बजावून कोणाला मतदान करायचे याचा निर्देश देता येऊ शकत नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...