Thursday, 7 November 2019

इतिहास - भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी

अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या ‘मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट‘ कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले.

सतत पडणार्‍या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक खास ‘दुष्काळ समिती‘ नेमली होती. याच समितीच्या शिफारशीन्वये 1883 मध्ये ‘दुष्काळ संहिता‘ तयार करण्यात आली.

लॉर्ड लिटनने इ.स. 1877 मध्ये दिल्ली येथे दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला ‘भारताची सम्राज्ञी‘ किंवा ‘कैसर-ए-हिंद‘ हा किताब दिला.

लॉर्ड लिटनने मार्च 1878 मध्ये ‘व्हरनेक्यूलर प्रेस अॅक्ट‘ (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली.

भारतीयांनी वरील कायद्याची ‘मुस्कटदाबी कायदा‘ (The Gagging Act) अशी संभावना केली.

1879 मध्ये लॉर्ड लिटनने ‘स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट‘ पास करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले.

लॉर्ड लिटनने अलिगड येथे स्थापन झालेल्या मुस्लिम विद्यापीठास प्रोत्साहन दिले.

लॉर्ड रिपन या उदारमतवादी व्हाईसरॉयची नियुक्ती लॉर्ड लिटननंतर झाली.

इ.स. 1881 मध्ये लॉर्ड रिपनने इंग्लंडप्रमाणे भारतात ‘फॅक्टरी अॅक्ट‘ पास केला.

लॉर्ड लिटनने केलेला देशीवृत्तपत्रबंदी कायदा लॉर्ड रिपनने 19 जाने. 1881 रोजी रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले.

इ.स. 1854 मध्ये ‘वुड समितीने‘ केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पाहण्यासाठी लॉर्ड रिपनने 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ‘हंटर समिती’ नेमली.

लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक ठराव पास केला. त्यामुळे त्यास ‘स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक‘ असे म्हटले जाते.

‘इलबर्ट बिल‘ पास करून रिपनने मोठेच धाडस केले परंतु युरोपियनांच्या सामुहिक प्रतिकारामुळे ते अस्तित्वात येऊ शकले नाही.

लॉर्ड डफरिनच्या कारकिरर्दितील महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.

लॉर्ड डफरिनच्या काळात लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 मध्ये करण्यात आली.

No comments:

Post a Comment