Wednesday, 2 February 2022

वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार

पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.

उद्देश विभाग/ उद्देशांग :-

1 ) उद्देश (कर्ता)

वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.

उदा.
रामुचा शर्ट फाटला. (फाटणारे काय/कोण?)

रामरावांचा कुत्रा मेला. (मरणारे कोण/काय?)

मोगल साम्राज्याचा अंत झाला. (होणारे-कोण/काय?)

रामुच्या घराचा दरवाजा उघडला. (उघडणारे कोण/काय?)

वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.

2) उद्देश विस्तार

कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.

उदा.
शेजारचा रामु धपकन पडला.

नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.

 विधेय विभाग/ विधेयांग :-

वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.

उदा. 
रामने झडाचा पेरु तोडला. (या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म).

गवळ्याने म्हशीची धार काढली. (या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म).

1) कर्म विस्तार

कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म विस्तार’ होय.

उदा. 
रामने झाडाचा पेरु तोडला.

गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.

2) विधान पूरक

कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते ‘विधानपूरक’ असते.

उदा. 
राम राजा झाला.

संदीप शिक्षक आहे.

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना ‘विधानपूरक’ असे म्हणतात.

3) विधेय विस्तार

क्रियापदास विधेय असे म्हणतात.

वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्‍या शब्दांचा यात समावेश होतो.

क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास ‘विधेय विस्तार’ उत्तर येते.

ही सर्व क्रियाविशेषणे असतात.

उदा. 
कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.

4) विधेय/क्रियापद

वाक्यातील क्रियापदाला ‘विधेय’ असे म्हणतात.

उदा.

रमेश खेळतो.

रमेश अभ्यास करतो.

रमेश चित्र काढतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...