Monday, 25 October 2021

राज्यसभा: संसदेचे वरिष्ठ सभागृह

1952 मध्ये स्थापन झालेल्या राज्यसभेचे सोमवारपासून सुरू झालेले हे 250वे अधिवेशन आहे.

Que: राज्यसभेचे एकूण सदस्य किती?
》राज्यसभेची सदस्यसंख्या सध्या २४५ आहे. पण ही संख्या २५० पर्यंत जाऊ शकते.

Que: महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृहातील प्रतिनिधित्व किती?
》राज्यसभेत महाराष्ट्राचे एकूण १९ खासदार निवडून येतात.

Que: दर दोन वर्षांनी राज्यातील किती सदस्य निवृत्त होतात?
》लागोपाठ दोनदा दर दोन वर्षांनी सहा सदस्य निवृत्त होतात. तिसऱ्या वर्षी सात सदस्य निवृत्त होतात. पुढील वर्षांच्या सुरुवातीला सात सदस्य निवृत्त होतील.

Que: अन्य राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व किती?
》उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ३१ सदस्य राज्यसभेवर निवडून येतात. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातून १९ सदस्य वरिष्ठ सभागृहात निवडून येतात. तमिळनाडू (१८), बिहार (१६), पश्चिम बंगाल (१६), आंध्र प्रदेश (११).

Que: राज्यातून सध्या राज्यसभेवर कोण सदस्य आहेत?
》पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले आणि व्ही. मुरलीधरन हे राज्यातील चार राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्य आहेत. शरद पवार, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे, वंदना चव्हाण, हुसेन दलवाई आदी सदस्य आहेत.

Que: राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची आवश्यकता असते?
》राज्यातून राज्यसभेवर निवडून जाण्याकरिता सरासरी ४२ मतांची आवश्यकता असते.

Que: महाराष्ट्रातील कोणत्या सदस्याने सर्वाधिक काळ राज्यसभेत प्रतिनिधित्व केले
》काँग्रेसच्या सरोजताई खापर्डे यांनी सर्वाधिक पाच वेळा राज्यातून राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ ते ७४, १९७६ ते १९८२, १९८२ ते १९८८, १९८८ ते १९९४, १९९४ ते २००० या काळात खापर्डे या राज्यसभा सदस्या होत्या.
- प्रमोद महाजन, आबासाहेब कुलकर्णी आणि सुरेश कलमाडी यांनी प्रत्येकी चार वेळा राज्यातून राज्यसभेत सदस्यत्व भूषविले.
- राज्यसभेचे सर्वाधिक काळ म्हणजे सहा वेळा सदस्यत्व नजमा हेपतुल्ला आणि राम जेठमलानी यांनी भूषविले. यापैकी हेपतुल्ला या चार वेळा महाराष्ट्रातून निवडून गेल्या होत्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून त्यांनी प्रतिनिधित्व केले.
- राम जेठमलानी यांनी १९९४ ते २००६ अशी १२ वर्षे राज्यातून प्रतिनिधित्व केले होते.

No comments:

Post a Comment