Friday, 22 November 2019

लेह मध्ये सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

💥 लेह इथं आयुष मंत्रालयांतर्गत  स्वायत्त संस्था म्हणून सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्था  स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.

💥 या संस्थेच्या उभारणीसाठी सुमारे 47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

💥 या संस्थेच्या उभारणीच्या टप्प्यापासूनच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी संचालकाच्या पदाची निर्मिती करायलाही मंजुरी देण्यात आली.

💥 लडाखची केंद्रशासित प्रदेश म्हणू निर्मिती झाल्यावर लडाखच्या स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सोवा- रिग्पा औषध प्रणालीचा प्रसार करण्यासाठी सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय  सरकारनं घेतला घेतला होता.

💥 या संस्थेच्या उभारणीमुळे  भारतीय उपखंडात सोवा रिग्पाचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. 

💥 केवळ भारतातल्याच नव्हे तर इतर देशातल्या विद्यार्थ्यांनाही या औषध प्रणालीचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल.

💥 सोवा रिग्पा ही देशात हिमालयाच्या पट्ट्यातली पारंपरिक वैद्यकीय प्रणाली असून, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश, लडाखचा केंद्रशासित प्रदेश या भागात आणि आता संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...