Saturday 16 November 2019

चालू घडामोडी प्रश्न:-

* IIT मद्रासने विकसित केलेले RISC-C इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारीत असलेली भारताची प्रथम स्वदेशी इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर चीप – शक्ती प्रोसेसर.

* 'गगनयान' अंतराळ मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या देशाच्या कंपनीसोबत करार केला – रशिया (ग्लॅवकोसमोस कंपनी).

*  या कंपनीने भारतात 'डिजिटल उडान' नावाचा डिजिटल साक्षरता उपक्रम जाहीर केला - जियो.

*  नासाची कोणती अंतराळ दुर्बीण २० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे:- स्पीटझर

*  इस्रोच्या चांद्रयान २ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे:- रितू करीधल व मुथय्या वनिथा

*  जगातील सर्वात लांब पूल कोणता :-हाॅगकाॅग-झुहाई पूल

* रुस्तम काय आहे:- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे

*  दस्तक अभियान काय आहे:- उत्तर प्रदेश राज्य शासनाने युनिसेफच्या सहकार्याने घरोघरी पोहचणारे दस्तक नामक अभियान आहे. त्याचे उद्दिष्टे हे जपानी मेंदुज्वाराचे राज्यातून उच्चाटन करणे हा आहे.

* मंत्रालयातील महिला कर्मचारी तसेच मंत्रालयात स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाचे नाव काय आहे:- हिरकणी कक्ष

No comments:

Post a Comment