Friday, 22 November 2019

नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवराला ‘रामसर’चा दर्जा मिळणार..

💥 नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले.

💥 बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे.

💥 नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

💥 त्यातील नांदूर मधमेश्वर आणि लोणारला लवकरच संमती मिळेल, असे सूतोवाच मँग्रोव्ह फाऊंडेशनचे अप्पर प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिले होते.

💥 ‘रामसर’च्या यादीत भारतातील 26 पाणथळ जागांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दोन जागांच्या समावेशामुळे महाराष्ट्रही या यादीत झळकेल.

💥 नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या 265 प्रजातींची नोंद झाली आहे.

💥 रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण 5 हजार 687 पक्षी आढळले आहेत.

💥 तर हे सर्वात छोटे पक्षी अभयारण्य आहे. विविध प्रजातींच्या पक्षांचे अस्तित्व इथे आहे. सरोवरातीलपाण्याचा सामू (पीएच) 10.5 असून यातील स्पुरूलिना शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत.

No comments:

Post a Comment