Thursday, 28 November 2019

महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी बद्दल त्यांचा परिचय

जोतीराव गोविंदराव फुले

(एप्रिल ११ , इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०),
क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.
‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता .

मूळ आडनाव – गोह्रे

जन्मदिनांक  – 11 एप्रिल 1827

मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य

ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.

१७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली.

१५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.

१८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.

१८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.

१८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.

१८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.

१८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.

No comments:

Post a Comment