महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित केली जाणार आहे.टीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आज दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची आहे. अलीकडेच शासनाकडून TAIT परीक्षा घेऊन पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जात आहे.TAIT परीक्षेमध्ये पहिली ते आठवी शिक्षक पदाचा अर्ज भरण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते. त्यामुळे यावर्षी टीईटी परीक्षेसाठी तब्बल १ लाख ८० हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.टीईटी परीक्षेबाबत सविस्तर माहिती https://mahatet.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*TET परीक्षा आयोजन*
■ TET पेपर पहिला - १९ जानेवारी २०२० (१०:३० ते १:००)
■ TET पेपर दुसरा -१९ जानेवारी २०२०(२:०० ते ४.३०)
*टीईटी प्रवेशपत्र प्रिंट*
४ जानेवारी २०२० ते १९ जानेवारी २०२०
*#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक #*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (पाचवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
के सागर/बाळासाहेब शिंदे
*4.गणित (30 गुण)*
सतीश वसे/नितीन महाले/शांताराम अहिरे
*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके तसेच अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/विनायक घायाळ
*घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ*
TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (तिसरी आवृत्ती)
परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक संदर्भ
TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2018 च्या मागील 5 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के'सागर पब्लिकेशन्स,पुणे
TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(पाचवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
के सागर/बाळासाहेब शिंदे
*# IMP पेपर दोन देतांना ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक पाच समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.#*
*4.गणित व विज्ञान (60 गुण)*
यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
सतीश वसे/नितीन महाले/शांताराम अहिरे
4.2- विज्ञान (30 गुण)
अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/कविता भालेराव/विनायक घायाळ
*5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)*
5.1- इतिहास (30 गुण)
१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
5.2 - भूगोल.(30 गुण)
१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
*TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
*टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी*
- बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
-मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
-बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
-परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
-इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पुस्तके वाचावीत.
-शक्य असल्यास नोट्स काढा/पुस्तकांना महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
-प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
-टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
- परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.
*Best of luck*
*#आपल्या एका share करण्याने गरजू विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळेल#*
No comments:
Post a Comment