Thursday, 7 November 2019

‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

🚦पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवडय़ात ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार देऊन बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीने गौरवण्यात येणार आहे.

🚦नेतृत्व व भारतातील स्वच्छता उद्दिष्टांची वचनबद्धता यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

🚦पंतप्रधान मोदी हे त्यांच्या अमेरिका दौऱ्यात ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलणार आहेत. त्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांचे भाषण होणार आहे.

🚦२ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

🚦आतापर्यंत स्वच्छ भारत मोहिमेत ९ कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते.

🚦भारतातील ९८ टक्के खेडय़ात सध्या शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून चार वर्षांपूर्वी हे प्रमाण ३८ टक्के होते. बिल गेट्स फाउंडेशनने २४ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...