०८ नोव्हेंबर २०१९

आपणास माहीत आहे का ?

१७ व्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर सर्वात जास्त कोणत्या राज्यात करण्यात आला :- आसाम२०१९ च्या लोकसभा निवडणूकामध्ये १.०४% मतदारांची नोटाला पंसती होती तर २०१४ मध्ये हेच प्रमाण १.०८% होते. आसाम राज्यामध्ये नोटाला सर्वाधिक २.०८% तर सिक्कीममध्ये सर्वात कमी ०.६६% मते मिळाली. देशामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान पालघर (महाराष्ट्र) या लोकसभा मतदारसंघातून झाले

• 2021 मध्ये होणारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे:- न्युझीलंड
आयसीसी द्वारा आयोजित महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जानेवारी फेब्रुवारी २०२१ मध्ये न्युझीलंड येथे आयोजित केली जाणार आहे. ५०-५० षटकांच्या या सामन्यात एकूण ३१ सामने खेळले जाणार आहेत

• भारतीय लष्कराकडून कोणत्या नदीवर सर्वात लांब मैत्री पूल नावाने झुलत्या पुलाचे बांधकाम करण्यात आले.:- सिंधू नदी
भारतीय लष्कराने १ एप्रिल २०१९ रोजी लडाख येथील लेहजवळ सिंधू नदीवर सर्वात लांब मैत्री नावाच्या झूलत्या पुलाची उभारणी केली. हा पूल लष्करातील लढाऊ अभियांत्रिकी दलाच्या साहस आणि योग्यता रेजिमेंटने बांधला. हा पूल अवध्या ४० दिवसांमध्ये बांधण्यात आला आहे. एवढ्या कमी वेळेत एवढ्या २६० फुट लांबीचा पूल बांधणे हा विक्रम ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...