Thursday 14 November 2019

विषय : महाराष्ट्र राज्य भूगोल प्रश्नसंच स्पष्टीकरण....

प्र.१) खालीलपैकी पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

अ) मावळ
ब) जुन्नर
क) अहमदनगर
ड) मेढा

उत्तर : ब) जुन्नर हा तालुका पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे.

प्र.२) महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

अ) खोपोली
ब) कोयना
क) वैतरणा
ड) वरीलपैकी नाही.

उत्तर : ब) कोयना जलविद्युत प्रकल्प....

प्र.३) महाराष्ट्र राज्यात कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या ठीकाणी आहे ?

अ) अमरावती
ब) जळगाव
क) अकोला
ड) यवतमाळ

उत्तर : क) महाराष्ट्र राज्यात कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ  अकोला या ठीकाणी आहे.

प्र.४) सुसरी हे धरण कोणत्या जिल्ह्यातील आहे ?

अ) जळगाव
ब) नंदुरबार
क) नांदेड
ड) औरंगाबाद

उत्तर : ब) सुसरी हे धरण नंदुरबार जिल्ह्यात आहे.

प्र.५) देहू हे धार्मिक ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?

अ) संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ
ब) संत तुकाराम महाराज समाधीस्थळ
क) संत एकनाथ महाराज समाधीस्थळ
ड) संत चोखामेळा महाराज समाधीस्थळ

स्पष्टीकरण : देहू हे धार्मिक स्थळ संत तुकाराम महाराज समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ आणि गाव सुद्धा देहूच आहे.

प्र.६) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते ?

अ) नाशिक
ब) अहमदनगर
क) कोल्हापूर
ड) पुणे

उत्तर : क) कोल्हापूर

प्र.७) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?

अ) ११,२०,५४,६६६
ब) ११,२३,७४,३३३
क) १२,३३,७५६,५४२
ड) २१,११,३३,६६६

उत्तर : ब)  ११,२३,७४,३३३ : सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ईतकी आहे.

प्र.८) महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?

अ) २९ जिल्हे
ब) ३४ जिल्हे
क) ३६ जिल्हे
ड) ३८ जिल्हे

उत्तर : क) ३६ जिल्हे
स्पष्टीकरण : सन २०११ च्या जणगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतात एकूण ६४० जिल्हे होते, त्यांपैकी ३५ जिल्हे महाराष्ट्र राज्यात होते,  आता ०१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 'पालघर' या नवा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३६ इतकी झाली आहे.

प्र.९) दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य देशात कितव्या स्थानावर आहे ?

अ) दुसर्या
ब) चौथ्या
क) सातव्या
ड) नवव्या

उत्तर : महाराष्ट्रात देशातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यांच्या ३ % टक्के साठे आहेत, दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य देशात सातव्या स्थानावर आहे.

प्र.१०) उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे ?

अ) पहिल्या
ब) दुसर्या
क) तीसर्या
ड) चौथ्या

उत्तर : उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसर्या स्थानावर असला तरी साखरेच्या उत्पादनात मात्र प्रथम स्थानावर आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...