Saturday 30 November 2019

मालदीवचे माजी अध्यक्ष गयूम यांना ५ वर्षांचा कारावास



🔺 यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले.

◾️माले : मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँडरिंग) आरोपाखाली दोषी ठरवून देशातील एका न्यायालयाने त्यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. गयूम यांनी ५० लाख डॉलरचा दंड भरावा, असाही आदेश पाच सदस्यांच्या एका फौजदारी न्यायालयाने दिला. गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार, न्यायालयाने यामीन यांनी सरकारी खजिन्यातील १० लाख डॉलर रकमेचा वैयक्तिक कामासाठी गैरव्यवहार केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचार, माध्यमांची मुस्कटदाबी करणे, आणि राजकीय विरोधकांना हद्दपार करणे असे आरोप लावण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली यांनी त्यांचा पराभव केला होता.

No comments:

Post a Comment