Tuesday, 19 November 2019

भुतान, जगातले प्रथम क्रमांकाचे आनंदी राष्ट्र कसे बनले ?

🔰"भुतान" हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांत सुंदर देश आहे. शून्य प्रदुषण.  देशभर कमालीची स्वच्छता, शांताता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.

🔰मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांची सुची तयार केली जाते. जगातील सुमारे 222 देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान प्रथम क्रमांकावर आहे.

🔰खरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही इथला माणूस आनंदी आहे. प्रसन्न आहे. सुखी आहे.

🔰का आहे? कसं जमलं त्यांना हे?
भुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.
भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.

🔰हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.

🔰थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.

🔰शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.

🔰तुम्ही जगात कुठेही गेलात तरी प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध रहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.

🔰भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील इतरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा नो चोर्‍या असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.

🔰हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारसे नाहीत.
चोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.

🔰भारतीय माणसांना त्यांच्या नोटा घ्यायची गरज नाही.  आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही.

🔰भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे.

🔰इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा नाही.

🔰यातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.

🔰माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?

🔰हे दोन प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.

🔰भारतानं भुतानकडून हे शिकायल हवं...

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...