Sunday, 3 November 2019

राज्यांत नाही एकही मानसिक हॉस्पिटल

देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक  हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर. देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.

▪ *राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
▪ *केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.

WHO रिपोर्ट:

●  24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
●  बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
●  पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.

राज्यांतील हॉस्पिटल संख्या:

*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2

देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.

No comments:

Post a Comment