Monday 11 November 2019

उत्पन्नात स्टॅच्यू ऑफ युनिटीने अव्वल

◾️ताजमहालाचे उत्पन्न ५६ कोटी रु. मात्र, पर्यटकांची संख्या पहिल्या स्थानी

◾️लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पूर्णाकृती पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटकांचे आकर्षणकेंद्र ठरला आहे.

◾️ सरदार पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी झाली. याच दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण होण्यास एक वर्ष पूर्ण झाले.

◾️वर्षभरात तिकिटांचा हिशेब ठेवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टला विक्रमी ६३.३९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले.

◾️ तिकिटांच्या उत्पन्नाबाबत ही आकडेवारी ताजमहालासह देशातील पाच ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्मारकांपेक्षा जास्त आहे.

◾️ ताजमहाल पाहण्यास ६४.५८ लाख लोक आले. ही संख्या सर्वाधिक आहे.

◾️तर एका वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी २४ लाख लोक आले आहेत. मात्र, ताजमहाल देश-विदेशातील पर्यटकांना आजही आकर्षित करतो.

✍कोठे किती प्रेक्षक आले, किती उत्पन्न

❗️स्मारक आवक। ❗️  (रुपये) ❗️ पर्यटक❗️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️स्टॅच्यू ऑफ युनिटी ❗️६३ कोटी❗️ २४.४४ लाख

◾️ताजमहाल ❗️५६ कोटी❗️ ६४.५८ लाख

◾️आग्र्याचा किल्ला❗️ ३०.५५ कोटी ❗️२४.९८ लाख

◾️कुतुबमिनार❗️ २३.४६ कोटी ❗️२९.३३ लाख

◾️फतेपुर सिक्री❗️ १९.०४ कोटी ❗️१२.६३ लाख

◾️लाल किला❗️ १६.१७ कोटी❗️ ३१.७९ लाख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment