📌केरळ सरकारने तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कप्पूकडू येथे हे केंद्र असणार आहे.
📕 काय असेल त्या ठिकाणी
📌हत्ती पुनर्वसन केंद्रामध्ये हत्ती संग्रहालय, प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सेवानिवृत्तीचे घर, प्राण्यांसाठी स्मशानभूमी असणार आहे. त्याचसोबत याठिकाणी अनाथ, जखमी आणि वृध्द हत्तीना घर मिळणार आहे.
📌केरळमध्ये निसर्गाच्या सानिध्यात जवळपास 65 हेक्टर जमिनीवर हे केंद्र तयार करण्यात येत आहे.
📌पहिल्या टप्प्यासाठी 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
📌हे केंद्र श्रीलंकेतील पिन्नवाला हत्ती अनाथाश्रमासारखेच असणार आहे.
📌या केंद्रामध्ये आतापर्यंत फक्त 15 हत्ती आहेत.
📌या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हत्तींची संख्या वाढवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment