Monday, 25 October 2021

मराठी व्याकरण - वर्णविचार

* आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना वर्ण असे म्हणतात. उदा क, ख, घ, ग

* मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.

* एकूण स्वर १२ आहेत.

* स्वरादी २ आहेत.

* मराठी भाषेत एकूण व्यंजने ३४ आहेत.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

स्वर 
* ऱ्हस्व - अ इ उ ॠ ऌ
* दीर्घ - आ ई ऊ
* संयुक्त - ए [अ +ई ] ऐ ओ औ

व्यंजने 
* कठोर - क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ,
* मृदू - ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ,
* अनुनासिक - ड़, न, ण, म,
* अर्धस्वर - य, र, ल, व,
*  उष्मा - श, ष, स,
* महाप्राण -  ह,
* स्वतंत्र - ळ,
* क्ष व ज्ञ हि दोन जोडव्यंजने आहे.
* क्ष = क + ष,  ज्ञ = द + न + य
* कंठ्य - क, ख, ग, घ, ड़, ह, - अ, आ.
* तालव्य - च, छ, ज, ज्ञ, य, श, - इ, ई
* मृधन्य - ट, ठ, ड, ढ, ण,
* दंत्य - त, थ, द, ध, न, ल, स, - ऌ
* औष्ठय - प, फ, ब, भ, म, - उ, ऊ,
* कंठ  तालव्य - ए, ऐ
* कंठोष्ट्य - ओ, औ,
* दंतोष्ठ्य - व,
* दंत तालव्य - च, छ, झ,

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संयुक्त स्वर 
ए = अ + इ किंवा औ = आ +उ = उ
* सजातीय स्वर - एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - आ

* विजातीय स्वर - भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - उ

* अनुनासिके - ड़, न, ण, आणि म, या वर्णाचा ऊच्चार हा त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून होतो. म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हणतात.

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात.

या लेखामध्ये आपण वर्णविचार या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या व या संदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्याख्या समजून घेणे व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

वाक्य, पद, शब्द, मूलध्वनी, वर्ण, अक्षर या संकल्पना समजून घेऊन व्याख्या लक्षात ठेवायला हव्यात.

* शासन निर्णय २००९नुसार वर्णमालेमध्ये ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश. यामुळे आधुनिक वर्णमालेमध्ये १४ स्वर आणि ५० वर्ण.

* ‘क्ष्’ आणि ‘ज्ञ्’ ही विशेष संयुक्त व्यंजने, तर ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही जोडाक्षरे.

🌿संधी - महत्त्वाचे मुद्दे🌿

वर्णविचारातील संधी हा एक महत्त्वाचा घटक आहे.

* संधी हा विषय संस्कृत व्याकरणातून मराठीत आल्यामुळे संधी झालेल्या शब्दाचा विग्रह व एकत्र येणारे वर्ण यामधील ऱ्हस्व - दीर्घ बारकाईने लक्षात ठेवावे लागतात.

* स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे संधींचे मुख्य तीन प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि मराठीचे विशेष संधी यांचा अभ्यास या घटकामध्ये आहे.
* संधींचे नियम लक्षात ठेवून त्यानुसार तयार होणारे शब्द लक्षात ठेवणे आणि उलट पद्धतीने प्रत्येक शब्द विचारात घेऊन तो कोणत्या संधिनियमाने तयार झाला असेल, याचा सराव करणे ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल.

* जास्तीत जास्त संधियुक्त शब्दांच्या विग्रहाचा सराव करणे आवश्यक आहे.
* मराठीचे विशेष संधियुक्त शब्द वगळता इतर सर्व संधियुक्त शब्द आणि त्यांच्या विग्रहातील शब्द मूळ संस्कृत असल्याने मराठीत तत्सम शब्द म्हणून गणले जातात हेही लक्षात घ्या.

* संधी घटकाचा अभ्यास उत्तमप्रकारे केला की ‘नियमानुसार शब्दलेखन’ या घटकाचाही बहुतांश अभ्यास होऊन जातो. अशा प्रकारे मुख्यत: वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित वर्णविचार हा घटक तुम्हाला संपूर्ण गुण मिळवून देऊ शकतो

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...