प्र.१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
अ) डेव्हिड लिप्टन ✅
ब) गीता गोपीनाथ
क) रॉड्रिगो रॅटो
ड) डॉमिनिक स्ट्रॉउस-कान
स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून डेव्हिड लिप्टन यांची नियुक्त करण्यात आले आहे.
प्र.२) भारत आणि ......... गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.
अ) इटली ✅
ब) फ्रान्स
क) जर्मन
ड) अमेरिका
स्पष्टीकरण : भारत आणि इटली गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.
प्र.३) फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?
अ) ओस्लो
ब) हवाना
क) हेलसिंकी
ड) सुवा ✅
स्पष्टीकरण : फिजी या देशाची राजधानी सुवा हि आहे.
प्र.४) कोणती व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे?
अ) कर्णम मल्लेश्वरी
ब) पी. टी. उषा ✅
क) अंजली भागवत
ड) मेरी कोम
स्पष्टीकरण : पी.टी.उषा हि व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे.
प्र.५) ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही परिषद कुठे भरणार आहे?
अ) श्रीनगर ✅
ब) जयपूर
क) विजयवाडा
ड) मुंबई
स्पष्टीकरण : ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही. परिषद श्रीनगर या ठिकाणी भरणार आहे.
प्र.६) फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) न्या. चंद्रचूड
ब) न्या. लोकूर ✅
क) न्या. कमल कुमार
ड) न्या. ए. के. मिश्रा
स्पष्टीकरण : फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर न्या.लोकूर यांची नेमणूक झाली.
प्र.७) ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती कोण?
अ) सँड्रा टॉरेस
ब) जिमी मोरालेस
क) अलेजान्ड्रो मालडोनाडो
ड) अलेजान्ड्रो गियामॅटी ✅
स्पष्टीकरण : ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती अलेजान्ड्रो गियामॅटी हे आहेत.
प्र.८) इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
अ) चंद्रिमा शहा ✅
ब) देविका लाल
क) सुब्रत बॅनर्जी
ड) कविता देसाई
स्पष्टीकरण : इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून चंद्रिमा शहा यांची निवड झाली.
प्र.९) मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?
अ) अरमान इब्राहिम
ब) आदित्य पटेल
क) ऐश्वर्या पिसे ✅
ड) समीरा सिंग
स्पष्टीकरण : मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती ऐश्वर्या पिसे आहे.
प्र.१०) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.
अ) भोपाळ
ब) नवी दिल्ली
क) भुवनेश्वर ✅
ड) आग्रा
स्पष्टीकरण : 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन भुवनेश्वर येथे झाले.
प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
अ) कटारिना जॉनसन थॉम्पसन✅✅✅
ब) व्हेरेना प्रीनर
क) नाफिसातौ थियाम
ड) लॉरा मुइर
स्पष्टीकरण : प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कटारिना जॉनसन थॉम्पसन यांनी जिंकले.
प्र.०२) भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव _ येथे आयोजित करण्यात आला आहे.
अ) राजस्थान
ब) उत्तराखंड✅✅✅
क) हिमाचल प्रदेश
ड) केरळ
स्पष्टीकरण : भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्र.०३) चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.
ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.
अ) केवळ अ ✅✅✅
ब) केवळ ब
क) केवळ अ आणि ब
ड) सर्व बरोबर आहेत
स्पष्टीकरण : केवळ अ हे चुकीचे आहे. ब हे बरोबर आहे. ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.
प्र.०४) भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?
अ) मंगोलिया✅✅✅
ब) कंबोडिया
क) लाओस
ड) व्हिएतनाम
स्पष्टीकरण : भारताच्या मदतीने मंगोलिया या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला
प्र.०५) उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?
अ) IIT कानपूर
ब) CSIR✅✅✅
क) IISc बेंगळुरू
ड) IIT खडगपूर
स्पष्टीकरण : उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी CSIR संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले.
प्र.०६) भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
अ) श्रीलंका
ब) बांग्लादेश✅✅✅
क) मालदीव
ड) पाकिस्तान
स्पष्टीकरण : भारताने शेजारच्या बांग्लादेश या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्र.०७) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.
अ) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
ब) राष्ट्रीय संरक्षण कोष
क) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
ड) यापैकी नाही
स्पष्टीकरण : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज वेलफेयर फंड अंतर्गत देण्यात येणार.
प्र.०८) 21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.
अ) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
ब) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
क) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
ड) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)
स्पष्टीकरण : ) 21 ऑक्टोबर 2019 रोजी NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन) सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.
प्र.०९) UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून यांची नेमणूक केली.
अ) कॅमेरून डायझ
ब) युना किम
क) मिली बॉबी ब्राउन
ड) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅
स्पष्टीकरण : UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून यांची नेमणूक केली. - यलिट्झा एपारीसिओ
प्र.११) जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.
अ) 7 ऑक्टोबर✅✅✅
ब) 9 ऑक्टोबर
क) 6 ऑक्टोबर
ड) 8 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : जागतिक अधिवास दिन 7 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment