Thursday, 21 November 2019

इस्रायली वसाहतींना अमेरिकेची मान्यता

📌धोरणातील बदलाने पॅलेस्टाइन नाराज :- पश्चिम किनारा भागातील इस्रायली वसाहती बेकायदा नसल्याचे जाहीर करून ट्रम्प प्रशासनाने आधीच्या धोरणात बदल केला आहे. इतके दिवस या वसाहती  आंतरराष्ट्रीय कायद्यातील निकषांशी सुसंगत नसल्याचे अमेरिकेचे मत होते, पण त्यातून मध्य पूर्वेत शांतता नांदण्यास मदत झाली नाही. त्यामुळे धोरणात बदल केल्याचे सांगण्यात आले.

📌अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सोमवारी याबाबतची घोषणा करताना सांगितले की, यावरील कायदेशीर मुद्दय़ांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या मते पश्चिम किनारा भागातील इस्रायली नागरिकांच्या वसाहती या आंतरराष्ट्रीय कायद्यातील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या नाहीत.  दरम्यान या धोरणात्मक बदलाचे इस्रायलने स्वागत केले असून पॅलेस्टाइनने त्यावर निषेध नोंदवला आहे.

📌इस्रायली नागरिकांच्या पश्चिम किनारा भागातील वसाहती बेकायदा ठरवून त्याचा काही फायदा झालेला नाही. त्यातून शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही. कारण यामुळे इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात शांतता चर्चा सुरू होण्यास प्रोत्साहन मिळणे अपेक्षित होते पण तसे घडले नाही.

No comments:

Post a Comment