Saturday, 18 December 2021

भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा

नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण.  हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.

सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कालावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.

प्रकाश वर्ष :– प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46×10)12 किमी

विस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.

गती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.

वेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.

त्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.

संवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग

कार्य :– वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर

ऊर्जा :- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

स्थितीज ऊर्जा :- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे गुरुत्वाकर्षनीय प्रवेग, =h म्हणजे पदार्थाची उंची.

गतीज ऊर्जा :- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात. KE=1/2 mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा, m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते.

No comments:

Post a Comment