Friday, 22 November 2019

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी

प्रिय मित्रांनो

आता सरकार कोणाचं याचा विचार करू नका.... जे आहे ते आहे.कारण राजकारण हे असच गलिच्छ अस्त.... आधी एकमेकांशी भांडण करतात व शेवटी सर्व विसरून मांडीला मांडी लावून बसायचं......

     माझ्या मते बेरोजगारी आणखी वाढेल व सर्व काही प्रायव्हेट झालच तर सामान्य माणूस संपेन...

  आता पुढे काय होत.....त्याचा विचार सोडून द्या व मन लाऊन फक्त आणि फक्त स्टडी वर सर्व मन केंद्रित करा.....

हेच काही वर्ष आहेत.. नंतर संधीचा सूर्य कधीच उगवणार नाही.. कारण अनेकांची वय निघून जातील.....म्हणून जियो या मरो इस साल बस एक पोस्ट यार... एवढे तयारीला लगा की स्वतःची भूकही आठवण देण्याचं विसरून जाईल☺️
येणाऱ्या...

MPSC,MPSC ग्रुप B,group C, megabharti. तसेच रेल्वे NTPC,रेल्वे ग्रुप D, यासर्व exam मध्ये आपल्या मराठी मुलांचा टक्का हा सर्वात जास्त असायला हवा....💐💐💐💐☺️

लक्ष्यात असुद्यात की जेव्हा खूप संकट येतात तेव्हा तुमचे ध्येय हे जवळ आलेले असते .....फक्त गरजेचं असते ते आपला स्पीड आणखी वाढवण्याची.......
   प्रयत्न असे घ्या की कुणी आपल्याला वेड्यात काढलं तरी चालेल पण आता..ध्येय गाठल्याशिवय मागे बघायचं नाही...

खरं तर maths आणि रिझनिंग हे विषय जवळपास सर्वच exam मध्ये असतातच..
सर्व आपल्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन खूप अभ्यास करा.... वेळेलाही तुमच्यासाठी आणखी थांबावस वाटायला हव एवढं मन लाऊन स्टडी करा.......
हीच सुवर्ण संधी आहे... व वेळ कमी.
दिवस असो वा रात्र... आपल्यासाठी एकच.........
छान स्टडी करा.... छान स्टडी करा व आपल ध्येय गाठ.... यश तुमचेच आहे.

या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही...
फक्त गरज आहे अफाट मेहनतीची...

न्यूजपेपर वाचत चला... पण न्यूज चॅनल शक्यतोवर बघून नका. कारण त्यामुळं माहिती कमी पण मन दुखावले जाण्याची व मन भरकटण्याची शक्यता जास्त......
हे सर्वांच्या बाबत नाही पण काहींसाठी आहे... विचार करणे सोडा व ध्येयाकडे जास्त लक्ष द्या.....
सर्वच सहमत असतील असे नाही. तसेच जर काहींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी..💐💐🙏
धन्यवाद💐💐🙏

No comments:

Post a Comment