Thursday, 15 December 2022

जाणून घ्या - पृथ्वीची परिभ्रमन गती

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीची परीभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात.

पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365.25 दिवस लागतात.

पृथ्वीच्या आसाने परीभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 66 1/2° अंशाचा कोन केला आहे.

पृथ्वीचे उत्तर ध्रुवाकडील टोक सतत धृव तार्‍याकडे रोखलेले राहते. याला पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा असे म्हणतात.

पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे व आसाच्या तिरपेपणामुळे पृथ्वीवर खालील गोष्टी घडून येतात.

सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन – पृथ्वीच्या परिभ्रमन काळात (एका वर्षात) सूर्याचे निरीक्षण केल्यास सूर्य 23 1/2° उत्तर ते 23 1/2° दक्षिण या दोन अक्षांशामध्ये प्रवास करीत असल्याचे दिसतो. यालाच सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात. या घटनेमुळे सूर्य 21 जून रोजी कर्कवृत्तावर (23 1/2° उत्तर) असतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणेकडे प्रवास करू लागतो. याला सूर्याचे दक्षिणायन असे म्हणतात. 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (23 1/2° दक्षिण) पोहचतो. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रावास करू लागतो. याला सूर्याचे उत्तरायण काळ म्हणून ओळखला जातो.

असमान दिवस व रात्र – पृथ्वीचे परीभ्रमण व आसाचे तिरपेपण यामुळे पृथ्वीवर असमान दिवस व रात्र निर्माण झालेले आहेत.

पृथ्वीवर 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर (उत्तर गोलार्धात) असतो, या दिवशी कर्कवृत्तावर दिवस मोठा व रात्र लहान असते आणि मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) दिवस लहान व रात्र मोठी असते.

21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र बारा तासाची असते.

22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) असतो. या दिवशी मकरवृत्तावर सर्वात मोठा दिवस व रात्र लहान असते आणि याच दिवशी कर्कवृत्तवार (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठी रात्र व दिवस लहान असतो.

काल्पनिक वृत्ते – सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायणामुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्धात 23 1/2° उत्तर अक्षांशावर कर्कवृत्त व दक्षिण गोलार्धात 23 1/2° दक्षिण आक्षांशावर मकरवृत्त हे काल्पनिक वृत्त निर्माण झालेले आहे.

पृथ्वीवर कटीबंध – पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवरील 23 1/2° 1/2° उत्तर आणि 23 1/2° दक्षिण ते 66 1/2° दक्षिण अक्षांक दरम्यानचा प्रदेश समशीतोष्ण कटीबंध म्हणून व 661/2° ते 90° उत्तर किंवा दक्षिण या भागातील प्रदेश शीत कटीबंध म्हणून ओळखला जातो.

पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती – पृथ्वीवरील असमान दिवस रात्र यामुळे ऋतू निर्माण झालेले आहेत.

उन्हाळा ऋतू – 21 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठा असल्यामुळे प्रकाश व उष्णता जास्त वेळ मिळते. या कारणामुळे या भागात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.

हिवाळा ऋतू – 23 सप्टेंबर ते 21 मार्च या काळात उत्तर गोलार्धात दिवस लहान व रात्र मोठी असते. यामुळे तेथे उष्णता व प्रकाश कमी काळ मिळतो आणि उष्णता उत्सर्जनाचा काळ जास्त असतो. या कारणामुळे उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...