Friday 15 November 2019

चला जाणून घेऊ - दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

▪ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर SBI, IDBI तसेच PNB या बँकांचे थकीत कर्जे होणार वसूल

▪ पगारावर GST लावण्याचा कुठलाही इरादा नाही, अफवांवर केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाचे स्पष्टीकरण

▪ ब्राझीलचे अध्यक्ष जाएर बोल्सोनारो यांना भारताच्या येत्या प्रजासत्ताक दिनासाठी नरेंद्र मोदींकडून निमंत्रण

▪ गाझा पट्टीतील धुमश्चक्रीची अखेर; इस्रायल सरकार आणि इस्लामिक जिहाद ग्रुप यांच्यात युद्धबंदी करार

▪ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

▪ युतीतील सत्तावाटपाच्या चर्चेबाबत अमित शहांनी सांगितलेलेच अंतिम सत्य; आशिष शेलारांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

▪ राफेलसाठी जुलै 2018 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात जाणीवपूर्वक दुरुस्ती; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर आरोप

▪ टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामचे केले 'रिल्स' नावाचे वैशिष्ट्यपूर्ण फिचर लॉंच

▪ बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, दिवसअखेर 6 बाद 493 धावा

▪ सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असणारा 'विक्की वेलिंगकर' चित्रपट 6 डिसेंबरला होणार प्रदर्शित

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...