Thursday, 14 November 2019

ई-गव्हर्नन्स : २२ वे राष्ट्रीय संमेलन

ई- गव्हर्नन्सचे राष्ट्रीय संमेलन आठ व नऊ ऑगस्ट रोजी मेघालयची राजधानी शिलाँग येथे पार पडले. हे संमेलन ईशान्य भारतात प्रथमच आयोजित करण्यात आले होते.

नव्या सरकारमधील पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळातील उपक्रमांचा एक भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ईशान्येकडील राज्यांचा विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि प्रधानमंत्री कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तिवेतन, सौर ऊर्जा विभाग व अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

‘डिजिटल इंडिया : प्रावीण्याकडून यशाकडे’ हा या संमेलनाचा मुख्य विषय होता.

या संमेलनात २८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे ५०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

या संमेलनाची सांगता नऊ ऑगस्ट रोजी शिलाँग जाहीरनाम्याच्या स्वीकृतीने करण्यात आली.

No comments:

Post a Comment