Monday, 18 November 2019

‘अग्नी-२’ची रात्रीची चाचणी यशस्वी

🅱 अग्नी-२ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिशा किनारपट्टीवरून घेतलेली रात्रीची चाचणी शनिवारी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटर असून, ते यापूर्वीच लष्कराच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र प्रथमच रात्रीच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आले.

🅱 २० मीटर लांबी असलेल्या या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करतेवेळी वजन १७ टन होते आणि ते एक हजार किलोग्रॅम वजन अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा बसविण्यात आली आहे.

🅱 ही नियमित चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ची वैशिष्ट्ये अग्नी २ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. याची लांबी सुमारे २० मीटर आहे आणि एक हजार किलो पेलोड घेऊन जाण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. दोन टप्प्यात आपलं लक्ष्य गाठणारं हे क्षेपणास्त्र सॉलिड फ्युएलवर चालतं. हे डीआरडीओने तयार केलं आहे.

No comments:

Post a Comment