Tuesday, 19 November 2019

नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड

🔰विश्वस्त म्हणून निवड झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.

🔰या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

🔰यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

🔰नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

🔰रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने भारतात कला, संगीत आणि संस्कृती विषयक अनेक उत्सव आणि महोत्सवांचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जातं आहे.

🔰या उपक्रमांमुळे अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं तर भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख जगभर पोहचण्यास मदत झाली असंही नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...