1⃣ जडत्व :
▪ जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.
▪ वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.
2⃣ संतुलित बल :
▪ संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.
▪ दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.
3⃣ असंतुलित बल :
▪ जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.
▪ वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
4⃣ बल :
▪ बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
▪ बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
▪ बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
▪ वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
▪ स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
No comments:
Post a Comment