Wednesday, 2 March 2022

मूडीजने भारताचे पतमानांकन घटविले


◾️अमेरिकी पतमापन संस्था 'मूडीज'ने भारताचे पतमानांकन
📌 स्थिर/स्टेबल वरून
📌नकारात्मक/निगेटिव्ह असे घटविले आहे.

◾️देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना सरकार सावरण्यास अपयशी ठरल्याचे सांगत ही घट करण्यात आली आहे. देशावरील वाढते कर्ज आणि वित्तीय/राजकोषीय तूट कमी करण्यात वाढत्या अडचणी यामुळे

◾️भारताचे रेटिंग 📌 Baa2 वर निश्चित केले आहे.

◾️ही शेवटून दुसरी सर्वात कमी गुंतवणूक श्रेणी आहे.

📌कसे ठरवतात पतमानांकन?

◾️ देशातील अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली असताना कोणत्याही देशाचे सरकार त्या देशातील विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक तणाव कमी करण्यात किती परिणामकारक राहिले आणि नागरिकांना रोजगार देण्यात सरकारने काय प्रयत्न केले यावरून पतमानांकन ठरविले जात असल्याचे मूडीज सॉव्हरिन रिस्क ग्रुपचे उपाध्यक्ष विल्यम फॉस्टर यांनी एका निवेदनात लिहिले आहे.

◾️यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या दोन्ही बाबी हाताळण्यास अपयशी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेचे मत झाल्याचे दिसते.

📌काय आहे मूडीजचे म्हणणे?

◾️ एकीकडे अर्थव्यवस्थेत काही अमूलाग्र बदल करताना वित्तीय तूट वाढून परिणामी कर्जाचे प्रमाण देखील वाढणार आहे

◾️त्याचवेळी परकी गुंतवणूकदार जर या मानांकनाचा विचार करून गुंतवणूक करण्यापासून दूर राहिले तर देशावर दुहेरी संकट ओढावू शकते.

◾️येत्या काळात जाहीर होणारे आर्थिक वृद्धी दराचे (जीडीपी) आकडे यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

◾️तसेच , बिगर बँकिंग कंपन्यांमध्ये आलेली स्थिरता हे देखील अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे मत पतमापन संस्थेने नोंदविले आहे.

No comments:

Post a Comment