Saturday 16 November 2019

१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

🅾१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये फास्टॅगद्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे.

🅾केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.

🅾नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर फास्टॅग लावावं लागणार आहे. हा फास्टटॅग अधिकृत टॅग विक्रेते किंना बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे.

🅾टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर फास्टॅक लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर फास्टॅक स्कॅन करतो. त्यानंतर फास्टॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

No comments:

Post a Comment