Wednesday, 19 June 2024

महत्त्वाचे आहे सर्व वाचून काढा

महत्वाच्या विकास योजना


1. रोजगार हमी योजना :

सुरुवात – 1952

उद्दिष्ट – ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे.

पार्श्वभूमी – श्री.वि.स. पागे यांच्या शिफारशीवरून 1965 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही योजना राबविली त्यानंतर 1969 मध्ये काही निवडक भागात प्रयोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली.

26 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्रभर लागू केली.

रोजगाराची हमी देणारा भारतातील प्रथम प्रयोग.

‘मागेल त्याला काम’ तत्वावर ही योजना सुरू केली.

योजनेचे स्वरूप :

शक्यतो शारीरिक कष्टाची कामे असतात.

या योजनेसाठी 6 मार्गानी पैसा उपलब्ध होतो.

18 वर्षावरील स्त्री-पुरूषांना कामे दिली जातात.

मजुरी दर आठवड्याला दिली जाते.

कामे कामगाराच्या घरापासून 8 कि.मी. अंतराच्या आत असतात.


2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (I.R.D.P.)

सुरुवात – 1978

उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा एकत्रित विकास करणे.

स्वरूप –

जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत बदल घडवून आणणे.

हा कार्यक्रम चालविण्यासाठी केंद्र – राज्य 50:50 या प्रमाणात खर्च करतात.

महाराष्ट्रात हा कार्यक्रम 2 ऑक्टोंबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यामध्ये सुरू आहे.


3. अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम (D.P.A.P.)

सुरुवात – 1974-75

उद्दिष्ट – राज्यातील दुष्काळी भागातील लोकांना दुष्काळाशी यशस्वीरीत्या मुकाबला करता यावा.


4. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना (TRYSEM)

सुरुवात – 15 ऑगस्ट 1979

उद्दिष्ट – ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी त्यांना शेती व शेती संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.

स्वरूप –

ही योजना IRDP चा विस्तारित भाग आहे.

लाभार्थी हा 15 ते 35 वयोगटातील असावा.

प्रशिक्षण कालावधी 6 महिने असतो.

प्रशिक्षित तरुणांना अर्थसाहाय्य व 10,000 रु. पर्यंत कर्ज मिळू शकते.


5. जवाहर रोजगार योजना (JRY)

सुरुवात – 1 एप्रिल 1989

उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे.

स्वरूप –

या योजनेचे मूळ रोजगार हमी योजनेत आहे.

ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमीहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचे विलीनीकरण करून तयार केली आहे.

या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किमान एका व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार मिळेल याची हमी दिली जाते.

या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामपंचायत करते.

या योजनेवर होणारा खर्च 80% केंद्र सरकार व 20% राज्य सरकार करते.    


6. नेहरू रोजगार योजना

सुरुवात – 1989-90 शहरी भागाचा विकास

उद्दिष्ट – नागरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे.


7. संजय गांधी निराधार योजना

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट – स्वत:चा उदरनिर्वाह करू न शकणार्‍या निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे.


8. संजय गांधी स्वावलंबन योजना

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट – स्वयंरोजगार करण्यासाठी लाभार्थीना कर्ज उपलब्ध करून देणे.


9. श्रमशक्तीतून ग्राम विकास

सुरुवात – 22 जून 1989

उद्दिष्ट – गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे.

ही योजना हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.


10. फलोत्पादन विकास योजना

सुरुवात – 21 जून 1990

उद्दिष्ट -राज्यात जास्तीत जास्त फळांची लागवड करणे.

ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.

ही योजना राबविण्याची अंतिम जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असते.


11. श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना

सुरुवात – 1 ऑगस्ट 1982

उद्दिष्ट – अपघातात मृत्यू पावणार्‍या अथवा अपंग होणार्‍या असंरक्षित कुटुंबियांना अर्थसहाय्य करणे.


12. इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर सहाय्य योजना

सुरुवात – 19 नोव्हेंबर 1991

उद्दिष्ट – 65 वर्षावरील पुरुष व 60 वर्षावरील स्त्रियां की ज्यांना काम होत नाही अशा व्यक्तींना अर्थसहाय्य देणे.


13. पीक विमा योजना

सुरुवात – 1985

उद्दिष्ट – शेतकर्‍यांच्या पीकांचा विमा उतरविणे. ज्यामुळे अवर्षण काळात शेतकर्‍यांना आर्थिकसहाय्य मिळते.


14. पंतप्रधान रोजगार योजना

सुरुवात – 1994-95

उद्दिष्ट – बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे.


15. इंदिरा आवास योजना

सुरुवात – 1985

उद्दिष्ट – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना पक्की घरे बाधण्यासाठी आर्थिक मदत करणे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...