Sunday 10 November 2019

तेजस्विनी सावंत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

◾️कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतने जगाच्या नकाशावर महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

◾️तेजस्विनी सावंत पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

◾️तेजस्विनीने दोहा इथं सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात चौथं स्थान पटकावलं आहे.

◾️या कामगिरीसह तिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटंही कन्फर्म केलं आहे.

◾️ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली तेजस्विनी ही भारताची 12वी नेमबाज ठरली आहे.

◾️ तेजस्विनी 1171 गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. त्यानंतर अंतिम फेरीत तिनं 435 गुणांची कमाई करत चौथं स्थान पटकावलं.

◾️39 वर्षांच्य़ा तेजस्विनी सावंतने याआधी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं आहे.

◾️2010 सालच्या म्युनिकमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीने 📌सुवर्णपदक जिंकलं होतं.

◾️ 2006 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 10 मीटर्स एअर रायफलमध्ये दुहेरीत आणि 📌वैयक्तिक सुवर्ण जिंकलं होतं.

◾️2018 साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात 📌सुवर्णपदकाची कमाई केली होती.

No comments:

Post a Comment